आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका पाटलाचा दुसऱ्या पाटलाला टोला:'जसे तुम्ही एका पाटलाचे खानापूर दाखवले, तसे दुसऱ्या पाटलाचे म्हैसाळा दाखवा'

कोल्हापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चंद्रकांत पाटलांचं जयंत पाटलांना टोला

आज राज्यातील ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत दिवसभर चर्चा सुरू होती , ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच गावी मिळालेल्या धक्क्याची. चंद्रकांत पाटील यांनी खानापूर गावात काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केलेली असतानाही भाजपला शिवसेनेकडून पराभव स्वीकारावा लागला. या निकालावर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाष्य केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला लगावला.

यावेळी पाटील म्हणाले की, 'ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले. पण, या यशात काही दुःख होणाऱ्या गोष्टी पण आहेत. उदाहरणार्थ माझे गाव खानापूर. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की, माझ्या 2200 लोकसंख्या असलेल्या गावाला तुम्ही जगभर पोहोचवले. त्या गावातही 9 पैकी तीन जागा भाजपाने जिंकल्या आहेत. त्याही 200 मतांची आघाडी घेऊन. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. पण जसं तुम्हा एका पाटलांचे खानापूर दाखवले, तसे दुसऱ्या जयंत पाटलांचे म्हैसाळा पण दाखवत चला. बाकी कोथळीपासून ढवळीपर्यंत दाखवा, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांना टोला लगावला.

खानापूरचा निकाल काय आहे ?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच खानापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपला शिवसेनेने जोरदार धक्का देत 9 पैकी 6 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

बातम्या आणखी आहेत...