आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:ग्रीनफील्ड हायवेबाधित शेतकऱ्यांचा मोर्चा

सातारा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बंगळुरू ग्रीनफील्ड हायवेबाधित शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्राला खासगी वाटाघाटीने एकरी दोन कोटी किंवा चालू बाजारभावाच्या दहापट मोबदला मिळावा, बाधित क्षेत्रातील बांधकामे, विहिरी, बोअरवेल, पाइपलाइन, फळझाडे, फळबागा यांचे चालू बाजारभावाप्रमाणे योग्य मूल्यांकन करून त्याच्या चारपट मोबदला मिळावा, प्रत्येक गावातील महामार्गबाधित शेतकऱ्यांना संपूर्ण मोबदला मिळत नाही तोपर्यंत ग्रीनफील्ड हायवेचे कसलेही काम सुरू करू नये या व इतर मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि पुणे-बंगळुरू ग्रीनफील्ड हायवेबाधित शेतकरी संघर्ष समितीमार्फत सातारा जिल्ह्यातील खंडाळा, कोरेगाव, खटाव व फलटण या चार तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांचा मोर्चा सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी दुपारी काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व संघर्ष समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई समीर देसाई आणि संघर्ष समितीचे सातारा जिल्हा अध्यक्ष रमेश शिंदे यांनी केले. मोर्चाच्या वतीने शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

बातम्या आणखी आहेत...