आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • Guwahatiwala Drama Became A Government In Maharashtra On The Strength Of Money, The Country Saw It Yogendra Yadav Said, An Attempt To Kill People In The Name Of Religion

महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार बनले:गुवाहाटीवाला ड्रामा देशाने पाहिला - योगेंद्र यादव म्हणाले, धर्माच्या नावावर लोकांना मारण्याचा प्रयत्न

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर कसे सरकार बनले तो गुवाहाटीवाला ड्रामा संपुर्ण देशाने पाहिला आहे. या देशातील धर्मनिरपेक्षता संपवून टाकली आहे. तथाकथित धर्म संसदेच्या नावावर एखाद्या समुदायाच्या लोकांना मारण्याचे खुले आवाहन केले जात आहे. गुन्हा नोंद होत नाही आणि कोणाला तुरूंगातही जावे लागत नाही. हे सर्व सत्तेच्या आशीर्वादाने होते, असे वक्तव्य स्वराज्य इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते योगेंद्र यादव यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत केले.

कराड येथे कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधी पुतळ्याजवळ या जनसंवाद यात्रेचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेस नेते उदयसिंह पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर पत्रकार परिषद होऊन ही यात्रा सातारला रवाना झाली. तत्पूर्वी कराड येथे पत्रकार परिषदेत योगेंद्र यादव बोलत होते.

लोकशाहीच्या चिंधड्या

योगेंद्र यादव म्हणाले, आज देशात अभूतपूर्व स्थिती आहे. समस्या केवळ सरकारबद्दलची नाही किंबहुना लोकशाहीवरच संकट नाही तर घटना आणि संपुर्ण देशावर संकट आहे. लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. याविरोधात आवाज उठविण्याची गरज होती. तो आवाज राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेमुळे बुलंद होईल. ही भारत जोडो यात्रा देशातील जनतेचे मौन तोडेल,

चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा प्रयत्न

​​​​​​​केजरीवाल सरकारचा दाखला देत योगेंद्र यादव म्हणाले की, दिल्लीत एक मंत्री डॉ. बाबासाहेबांची शपथ घेतो. त्याच्या विरोधात भाजप देशभर आंदोलन करते आणि आम आदमी पार्टी त्याला पक्षातून काढून टाकते. आज त्याच पद्धतीने हिंदुत्वाच्या आडून देशात पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. हे महाराष्ट्रात येऊन सांगण्याची गरज नाही. कारण, संविधानाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या लोकांकडून देश तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

समाधान होत नाही

योगेंद्र यादव म्हणाले की,​​​​​​​ देशापुढील एवढ्या मोठ्या संकटाचे समाधान संसदेकडून होऊ शकत नाही. कारण संसदच या समस्यांचा हिस्सा बनली आहे. दुर्देवाने या संकटाचे समाधान कोर्ट-कचेरी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातूनही होत नाही. लोकशाहीच्या इतिहासात ज्यावेळी असे प्रसंग आले आहेत. त्यावेळी जनतेलाच रस्त्यावर उतरावे लागले आहे. आज तेच काम भारत जोडो यात्रा करत आहे. या पदयात्रेने देशासमोरील बेरोजगारी, गरिबी, महागाई, वाढती अर्थिक विषमता यासारखे मुद्दे जनतेसमोर आणले.

आग आटोक्यात आणणारा मित्र

योगेंद्र यादव म्हणाले की, देशातील सुडाच्या राजकारणाविरोधात भारत जोडो यात्रा उभी राहिली आहे. त्यामुळे आम्ही सर्व संघटनांनी जुने मतभेद बाजूला ठेऊन या यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. माझ्या घरात आग लागलेली असेल तेव्हा मला दोनच पक्ष दिसतात. एक पेट्रोलची बाटली घेऊन फिरणारा आणि दुसरा पाण्याची बादली घेऊन पळणारा, आज जो पाण्याची बादली उचलेल तो माझा मित्र, भाऊ आहे. आम्ही त्याच्या बरोबर काम करू. याच संकल्पनेने आम्ही भारत जोडो यात्रेत सामील झालो आहोत.

आमचीही पदयात्रा

योगेंद्र यादव म्हणाले, महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यातून आमची पदयात्रा दि. 9 रोजी नांदेडला पोहचेल आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला जाऊन मिळेल. कराड मधील पत्रकार परिषदेचा कार्यक्रम उरकल्यानंतर ही जनसंवाद यात्रा सातारकडे रवाना झाली सातारा येथे लोणंद रस्त्यावरील वाडे फाटा येथे सातारकरांच्या वतीने स्वागत करण्यात आल्यानंतर ही जनसंवाद यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून राजपथ मार्गे राजवाडा येथे गेली .‌ तेथे या पदयात्रेचे रूपांतर सभेत झाले.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...