आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारांचा जोरदार पाऊस:सांगोल्यात गारपीट; घरांचे छप्पर उडाले, सांगोला शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी विजेच्या कडकडाटासह गारांचा जोरदार पाऊस झाला

सांगोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सांगोला शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी विजेच्या कडकडाटासह गारांचा जोरदार पाऊस झाला. यात अनेक घरांचे नुकसान झाले. तसेच यात मोठ्या प्रमाणात शेतीचेही नुकसान झाले. कोळा येथे आज बाजार होता. दुपारी तीनच्या सुमारास विजेचा कडकडाट व वाऱ्यासह गारांचा सुमारे २० मिनिटे पाऊस झाला.

या पावसाने बाजारपेठेतील रस्त्यावर पाणी साठले. हे पाणी गटारी तुंबून व्यापाऱ्यांच्या दुकानात व गोदामात शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. या पावसामुळे बोर, डाळिंब, द्राक्ष फळबागा तसेच हरभरा, मिरची, टोमॅटो, ढोबळी मिरची, काकडी, भाजीपाला याचेही मोठे नुकसान झाले. जनावरांचा कडबा भिजला व वाऱ्याने उडून गेला.