आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कष्टकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे:शेतीत जाऊन पिकांची पाहणी करतानाच कामही केले,  गाईला चारा भरवला

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील दरे या अापल्या मूळ गावी जाऊन ग्रामदैवत उत्तरेश्वराचे दर्शन घेतले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या शेतीत जाऊन पिकांची पाहणी करतानाच कामही केले. त्यांनी गोठ्यात जाऊन गाईला चारा भरवला. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरीच्या शेतीची पाहणी करत कष्टकऱ्यांना सूचनाही केल्या. मुख्यमंत्र्यांनी पिकाला पाणी देण्यासाठीच्या ठिबक सिंचन यंत्रणेचीही पाहणी करून पिकांना पाणी देण्याची सूचना केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवाजम्यासह मूळ गाव असलेल्या दरे (ता. महाबळेश्वर) येथे पोहोचले. त्यांनी काही वेळ शेतीत घालवला.

बातम्या आणखी आहेत...