आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:बदल्यांबाबत चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली'; हसन मुश्रीफ यांचा टोला

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

राज्यातील अधिकार्‍यांच्या बदल्यांवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्र्यांनी वरकमाई केल्याचा आरोप करीत, सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. त्यांचे हे आरोप म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली ', असा प्रकार असल्याची खिल्ली ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उडवली आहे .

कोरोना ही जागतिक महामारी आहे. अशा महाभयानक संकटात हातात हात घालून एकजुटीने लढण्याची गरज आहे. परंतु विरोधक मात्र अशा काळातही आंदोलने करीत आहेत. तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत? असा सवालही मंत्री मुश्रीफ यांनी केला आहे. अशी फसलेली आंदोलने कशाला करताय? किमान अभ्यास करून तरी आंदोलन करा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना तर मी किती ओरडून सांगितलं तुमचं सगळं पंचांग बरोबर आहे पण हे मुहूर्त चुकतात कसे?

राज्यातील पाच कोटी ग्रामीण जनतेला अर्सनिक अल्बम -३० आणि संशमनी वटी या होमिओपॅथिक औषध वाटपाचा प्रारंभ कोल्हापुरातून झाला. शासकीय विश्रामगृह आवारात राजर्षी शाहू सभागृहात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते.

मग 2014 पासूनच चौकशी करु...

मुश्रीफ पुढे म्हणाले, शासकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांवरून चंद्रकांत पाटील सीआयडी चौकशी लावा म्हणतात. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, २०१४ पासून सगळ्याच बदल्यांची चौकशी करूया. त्यालाही माझा पाठिंबा आहे.

बिळात बसलेल्या विरोधकांनी पीपीई कीट घालून कोरोना वाॅर्डात जाऊन यावे....

आमच्या विरोधी मित्रांना कधी काय करावं याच टाइमटेबल समजेनासं झालं आहे, त्यामुळेच ते त्रस्त आहेत. आंदोलन हा लोकशाहीचा आत्मा आहे. आंदोलने, चळवळी टिकल्या पाहिजेत. परंतु, विरोधकांनो कोरोनाच्या काळात बिळात लपून बसू नका, जरा बाहेर या. एकदा पीपीई किट घालून, कोरोना वॉर्डातून जाऊन या आणि किती घाम सुटतोय अनुभवा.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, सबंध मंत्रिमंडळ, डॉक्टर, नर्सेस, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, महसूल कर्मचारी पोलीस जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता गेले पाच महिने राबताहेत आणि तुम्ही आंदोलने करताय? लाज वाटली पाहिजे तुम्हाला असेही मुश्रीफ म्हणाले.

सतेज पाटील चांगले काम करत आहेत...

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील असले काय आणि हसन मुश्रीफ असले काय? ते सगळे एकच आहे. पालकमंत्री म्हणून सतेज पाटील यांचे काम अतिशय उत्कृष्ट सुरू आहे. मी तर त्यांचं मनापासून कौतुक करतो की कोरोनासारख्या आपत्तीचा कोणताही अनुभव नसताना गेले पाच महिने ते अखंडपणे निस्पृह काम करीत आहेत.

पार्थ पवार यांचे वक्तव्य हा पवार कुटुंबाचा कौटुंबिक विषय आहे. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार सक्षम आहेत. त्याआधी सुशांतसिंग राजपूत आत्महत्या आणि आता पार्थ पवार असे विषयी जरा बाजूला ठेवून लोकांचे कोरोनाबद्दल प्रबोधन करूया......

बातम्या आणखी आहेत...