आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:बैल आल्यावर त्याची शिंगे पकडली; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

कोल्हापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आ बैल मुझे मार... नाही तर वेगवेगळ्या रूपाने मारण्यासाठी आलेल्या बैलाची शिंगे पकडली, असा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे. मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील आरोप प्रत्यारोपाची आणि मुहावर्यांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

यापूर्वी राज्यात काहीही घडले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील हे बोलण्याआधी मुश्रीफ वक्तव्य करतात. त्यांची ही कृती म्हणजे "आ बैल मुझे मार" व निष्ठा दाखवण्याची त्यांची केविलवाणी धडपड असते, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. राज्य सरकारच्या बदल्यांच्या प्रकरणावरून 'सौ चुहे खा के बिल्ली चली हजको', अशी टिप्पणी मुश्रीफ यांनी केली होती.. त्यावर पाटील यांनी प्रत्युत्तर दिले होते. आज पुन्हा मुश्रीफ यांनी पाटील यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे.

मुश्रीफ म्हणाले, मी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून कोणतीही टीका करणारे विधान कधीच केले नव्हते. पहिल्यांदा माहिती न घेता मुद्दाम माझी व माझ्या ग्रामविकास विभागाची बदनामी करण्याच्या उद्देशाने श्री. पाटील यांनी ग्रामविकास विभागाने २३ रुपये अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदी करून भ्रष्टाचार केला व त्याच गोळ्या दोन रुपयांनी मी खरेदी करून कोथरूड मतदारसंघांमध्ये दिल्या आहेत,असे विधान केले होते. त्यानंतर पत्र पाठवून त्यांचेवर न केलेल्या विधानाचा संदर्भ देऊन कोरोना काळामध्ये आपण किती मदत केली (प्रचंड माया असल्यामुळे), त्यांची उदाहरणे देऊन आम्हांस आत्मचिंतन करण्याचे आवाहन केले होते.

त्यावर मुश्रीफांनी चंद्रकांत पाटील यांचा एक चेहरा परोपकारी, प्रांजळ, लोकांना प्रामाणिक आहे असा भास व्हावा व दुसरा चेहरा सत्ता संपत्तीच्या जोरावर आपल्या विरोधकास जीवनातून उठवण्याच आहे असे विधान केले. तसेच सत्तेचा उपयोग करून रक्तबंबाळ करून 'आ बैल मुझे मार', असे विधान करत चोराच्याच उलट्या बोंबा याचाच प्रत्यय पाटील देत आहेत असेही म्हणाले.

तसेच निष्ठा दाखवण्यासाठी मुश्रीफांना केविलवाणी धडपड करावी लागते, असे पाटील म्हणाले होते. त्यावर अशी हास्यास्पद विधाने करू नका. कारण कितीही संकटे आली, मला भाजपमध्ये घेऊन मंत्री केले की, प्रचंड माया दिली त्यावेळीही पवार एके पवार म्हणणारा, मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता आहे. सत्ता असली काय आणि नसली काय. मला फरक पडत नाही. ज्यावेळी परमेश्वराच्या कृपेने व जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने सत्ता येते, त्यावेळी फक्त लोककल्याण व विकास हे दोनच माझ्या डोळ्यासमोर असतात.

सत्तेचा वापर करून शत्रूचेही भले करण्याचा माझा प्रयत्न असतो. लोक वैचारिक विरोधक असतात, ते आपले शत्रू असत नाहीत. श्री पाटील यांनी निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये कंपन्यांचे संचालक असल्याचे लपवल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी खटला करावा. अशा आशयाच्या बातम्या आल्या आहेत. त्याबद्दल मला कोणतेही देणे घेणे नाही. असे व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा त्यांच्या वाळल्या पालापाचोळ्यावरसुद्धा मी पाय ठेवत नाही. ही माझी संस्कृती आहे.

मायक्रोफायनान्सच्या फेऱ्यामध्ये अडकलेल्या महिलांच्या मदतीसाठी अभ्यासगट नियुक्त करणार

अलीकडच्या काळात मायक्रो फायनान्सच्या दुष्टचक्रात महिला अडकलेल्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी लवकरच अभ्यासगटाची नियुक्ती करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. यावेळी मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, देशामध्ये बचतगटांची चळवळ साधारणता ३० ते ३५ वर्षे सुरू झाली. बचत गटामार्फत महिला सक्ष्मीकरण्यासाठी केंद्रशासन व राज्यशासन दरवर्षी हजारोकोटी रुपये खर्च करत आहे. बचत गटांची निर्मिती, अनुदान, सुलभ कर्जे, व्याजामध्ये सवलत अनुदान, बचतगटांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देणेकमी शासनाकडून भरघोस प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ग्रामविकास विभागातर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान MSRLM च्या माध्यमातून दरवर्षी ६०० कोटीहून अधिक इतका निधी खर्च केला जातो .

मागील वर्षी महापुराच्या संकटानंतर व आजही हजारो महिला मायक्रो फायनान्सच्या फेऱ्यांमध्ये अडकलेल्या होत्या व त्या कर्जमाफी करावी यासाठी आंदोलने करत होत्या. शिरोळ तालुक्यातील महिलांनी भरलेल्या पंचगंगा नदीमध्ये आंदोलन केले होते. तसेच आजही राज्यामधील अनेक महिला मायक्रो फायनान्सच्या कर्जास माफी द्यावी, अशी मागणी करत आहे. रिझर्व बँकेच्या मान्यतेने या मायक्रो फायनान्स कंपन्या काम करतात. अडल्या, नडलेल्या महिलांना ते कर्ज देतात. व्याजाचा दर दसादशे २४ % टक्के इतका प्रचंड असतो. मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा महिना हप्ता व व्याज, हप्ता न दिलेस प्रांपचीक साहित्य जप्त केले जाते. प्रापंचिक खर्च जादा आहे काय ? मुलांच्या शिक्षणासाठी व घरातील पुरुषांच्या मानसिकतेमुळे त्या कर्जबाजारी झाल्या का ? त्याची कारणे काय? कशामुळे माझ्या भगिनींनवर ही वेळ आली? यावर अभ्यास करून त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी, एमएसआरएलएम माध्यमातून त्यांना काय मदत करता येईल, इत्यादी बाबतीत एक महिलांचा अभ्यासगट नियुक्त करण्याचा शासन गंभीर विचार करत आहे. लवकरच यावर निर्णय अपेक्षित आहे असेही त्यांनी सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser