आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:'कोरोनाबाबत अवाक्षरही न काढणाऱ्या अमृतावहिनी सुशांत सिंह आत्महत्येबाबत आश्चर्यजनक बोलल्या'; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची टीका

कोल्हापूर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

कोरोनाबाबत एक अवाक्षरही न काढणाऱ्या अमृतावहीनी एका आत्महत्या तपासावरुन मुंबई सुरक्षित राहिली नाही, असे वक्तव्य करतात. हे आश्चर्यजनक आहे अशी टीका ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. तसेच महाराष्ट्रासह देशात आणि सबंध जगात कोरोना महामारीने कहर केला असताना. समाज गांभिर्य बाळगणार की अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्महत्या प्रकरणाची चर्चा करीत राहणार? असा उद्विग्न सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

2020 नंतरचे समृद्ध गतजीवन प्राप्त झाले पाहिजे. यासर्व विचारांच्या ऐवजीं गेले दोन आठवडे फक्त एक अभिनेता सुशांतसिग राजपूत यांच्या आत्महत्या विषयीच चर्चा होताना दिसते. आत्महत्या का केली ? कशासाठी केली ? त्याचे किती तरुणींच्यावर प्रेम होते ? तो जीवनात यशस्वी झाला की नाही ? या सगळ्याची चौकशी होईल. त्यासाठी मुंबई पोलीस जगामध्ये सक्षम आहेत.