आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भाजप आंदोलन:'फडणविसांचे मुहूर्त कायम चुकीचेच'; शासकीय सुट्टीच्या दिवशी होणाऱ्या दुध आंदोलनावर हसन मुश्रीफ यांचा टोला

कोल्हापूर4 दिवसांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कायम चुकीचेच मुहूर्त काढत आहेत, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. त्यांना नेमकं काय झालय, हेच समजत नाही असेही मुश्रीफ म्हणाले.

गडहिंग्लजमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले की, भाजपचे दूध दरासाठीचे आंदोलन योग्य आहे. दुधाला दर मिळालाच पाहिजे. परंतू, आंदोलनासाठी त्यांनी काढलेला मुहूर्त चुकीचा आहे. उद्या शासकीय सुटीच्या दिवशी व बकरी ईद असताना आंदोलन पुकारले आहे. अशा परिस्थिती त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशी बेईमान म्हणत टीका केली केली होती. उलट यादिवशी त्यांचे अभिष्टचिंतन करण्याचे सोडून फडणवीसांनी भाजप कार्यकारिणी बैठक घेत त्यांना दुषने दिली. महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी उंची असून महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, ही कुठली संस्कृती? असा सवालही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केला.

Advertisement
0