आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात मतदारांनी महाविकास आघाडीला यश दिले. निवडणूक निकालानंतर बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यापुढे ही आम्ही कसे लढायचे ते आमचे आम्ही बघु, चंद्रकांत पाटील यांनी पराभवाचे आत्मचिंतन केलेले बरे, आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही, असा टोला लगावला आहे. निकालानंतर पाटील यांनी एकटे एकटे लढा, असे आव्हान दिले होते. यावर मंत्री मुश्रीफ पत्रकार परिषदेत बोलत होते.
या निवडणुकीत भाजपचा पराभव करुन सत्ता आणि संपत्तीची मस्ती आणि सुडाची भावना नसावी असा संदेशच जनतेने दिला आहे. सुशिक्षीत मतदारांमध्ये इतका रोष आहे. तर सर्वमान्य जनतेत किती असेल, याचा विचार भाजपने करावा, कोणतीही सार्वत्रीक निवडणूक होवू दे त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे या निकालावरुन स्पष्ट झाल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत
या पुढील सर्वच निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. मंत्रीमंडळाच्या निर्णयाचा आदर करुन राज्यपालांनी 12 आमदांच्या नावाला लकरात लवकर मान्यता दिली पाहिजे. मंत्री असताना चंद्रकांतदादांनी मला राजकीय आणि समाजिक जिवनातून कायमचे उठवण्याचा प्रयत्न केला म्हणून माझा त्यांच्यावर सात्विक राग आहे असेही ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.