आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर जिल्हा बँकेत दुसऱ्या दिवशीही ईडीची छापेमारी:हसन मुश्रीफ यांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी कामगार मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेत बुधवारी ईडीकडून छापा टाकण्यात आला होता. आज दुसऱ्या दिवशीही ईडी पथक जिल्हा बँकेत दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. कागलमधील शाखेत ईडीचे अधिकारी आजही ठाण मांडून आहेत.

आता हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सकाळपासून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून आज पुन्हा एकदा कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.

काल ईडीकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील जिल्हा बँकेची शाखा, तसेच गडहिंग्लज तालुक्यातील हरळीमधील अप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्याला लागून असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेवर छापेमारी टाकण्यात आली होती.

याआधीही छापेमारी

11 जानेवारी रोजी हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापशी येथील साखर कारखाना व मुलीच्या घरी ईडीने छापे टाकले होते. ​​​​​​त्यानंतर काल कोल्हापूर जिल्हा बॅकेच्या मुख्य शाखेवर सकाळी 11 वाजता शाहूपुरी येथील मुख्यकार्यालयात ईडीचे पथक पोहचले. आज दुसऱ्या दिवशीही ईडीची चौकशी कायम असल्याने कोल्हापुरातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सोमय्यांचे आरोप काय होते?

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयासह 100 कोटींचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्यांनी केला होता. या प्रकरणीच ही छापेमारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...