आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पाऊस:कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, नागरिकांची उडाली ताराबंळ

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. आज दुपारपासून हवेत प्रचंड उष्णता वाढली होती. दुपारनंतर ढग दाटून आले. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शहरासह जिल्ह्यातील कागल, इचलकरंजीसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी छताचे पत्रे उडून गेले. पावसाच्या तडाख्याने अनेकांचे नुकसान झाले. अचानक झालेल्या या पावसाने बाहेर असलेल्या नागरिकांची ताराबंळ उडाली.

बातम्या आणखी आहेत...