आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉयलेट व्हॅन:भंगारात निघालेल्या बसपासून तयार केले हायटेक मोबाइल टॉयलेट, कोल्हापूर महानगरपालिकेचा उपक्रम

कोल्हापूर / प्रिया सरीकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर हे पर्यटन आणि धार्मिक स्थळ असल्याने येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. खरेदीसाठी बाजारपेठाही फुललेल्या असतात. मात्र, काही ठिकाणी स्वच्छतागृहांचा अभाव आहे. यामुळे विशेषत: महिलांची फार गैरसोय होते. हीच अडचण लक्षात घेऊन कोल्हापूर महापालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कोल्हापूर मनपा परिवहन खात्याच्या भंगारात निघालेल्या बसपासून मोबाइल टॉयलेट व्हॅनची (फिरते शौचालय) निर्मिती केली आहे. पुण्याच्या कल्याणी टेक्नॉलॉजी कंपनीच्या सीएसआर फंडातून ही व्हॅन तयार केली आहे.

व्हॅनमध्ये पुरुष आणि महिला असे दोन स्वतंत्र विभाग आहेत. तसेच कमोड, वाॅश बेसिन, शौचालये आणि महिलांसाठी चेंजिंग रूमही आहे. शहर परिसरात नवरात्रोत्सवाच्या काळात या मोबाइल टाॅयलेट व्हॅनचा उपयोग झाला. यानंतर गर्दीच्या ठिकाणी ही व्हॅन लावली जाते. तसेच आरोग्य विभागाच्या मागणीनुसार ही व्हॅन पाठवली जाते.

स्क्रॅपच्या बसचा इथे असा होतो वापर.... : केएमटीच्या (कोल्हापूर म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट) वर्कशॉप विभागातील कर्मचाऱ्यांच्या कौशल्याने स्क्रॅपच्या बसची बांधणी करण्यात आली. त्यांनी कोरोनामध्ये ‘फिरता दवाखाना’ तयार केला होता. आजही त्याचा उपयोग होत आहे.

मोबाइल टॉयलेट व्हॅनमधील सुविधा.... : महिलांसाठी ३ शौचालये, स्वतंत्र चेंजिंग रूम. पुरुषांसाठी तीन शौचालये-३ मुताऱ्या. दोन्ही विभागांत कमोड व वॉश बेसिनची सुविधा. बसवर एक हजार लिटरच्या दोन पाण्याच्या टाक्या, बसखाली ड्रेनेजच्या दोन टाक्या. दोन्हीकडे बॉश बेसिन. एलईडी बल्ब, फॅन, इन्व्हर्टर.

बातम्या आणखी आहेत...