आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:ऐतिहासिक ठेवा सापडला, रायगडावर उत्खननात सापडली सोन्याची बांगडी

कोल्हापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडास भेट देऊन उत्खननात मिळालेल्या या ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली. - Divya Marathi
युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडास भेट देऊन उत्खननात मिळालेल्या या ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली.

रायगड प्राधिकरणामार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननाचे महत्त्व शुक्रवारी पुन्हा अधोरेखित झाले. गडावर आतापर्यंत उत्खननात भांडी, नाणी, घरांची कौले सापडली आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी सोन्याची बांगडी सापडली. पुढेही अनेक ऐतिहासिक वस्तूंसह वेगवेगळे अलंकारही उत्खननात मिळू शकतात. यामुळे गडावरील तत्कालीन राहणीमान, संस्कृती, वास्तुरचना नव्याने समजण्यास मदत होणार आहे. यामुळे ऐतिहासिक महत्त्व व माहिती समजण्यास मोलाची मदत हाेईल.

- पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामगिरीबाबत संभाजीराजे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...