आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळे फासण्याचा प्रयत्न:आमदारांच्या कार्यालयावर ‘सैनिकांचा’ टरबुजांचा मारा

सांगलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर भाजपचे सरकार येणार म्हणून जल्लोष केला गेला. नेते ढोल-ताशा लावून थिरकत असतानाच मिरजेचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी टरबूज व दगडफेक करून आक्रमकता दाखवली.

बुधवारी सायंकाळी ५.४५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पदराआड लपून बसलेल्या शिवसैनिकांना ‘या चिमण्यांनो परत फिरा....’ असे आवाहन केले. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे शिवसेनाच आहे. या भावनेने खाडे यांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी टरबूज आणि किरकोळ दगडफेक केली. तर त्यांच्या फलकावरही काळे फासण्याचा प्रयत्न केला.

सांगलीत मात्र सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयाबाहेर ढोल-ताशांच्या तालावर आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश सदस्य शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, माजी आमदार नितीन शिंदे, महापालिका सभागृह नेते विनायक सिंहासने, नगरसेविका भारती दिगडे, संगीता खोत यांनी ‘पुन्हा देवेंद्र’ असा ठेका धरत मोठा जल्लोष केला.