आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे आव्हान वाटत आहेत म्हणून त्यांनी शिवसेना फोडली. आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, पण कितीही खंजीर खुपसा, शिवसेना संपणार नाही. तुम्ही आता निवडणुका घ्या १५० जागा आम्ही जिंकू, असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. तसेच गद्दारांच्या हातात महाराष्ट्राच्या चाव्या देता, बाळासाहेबांचा आत्मा गद्दारांच्या हातात देताना लाज कशी वाटली नाही? इतके बेईमान कसे झालात? असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला.
राऊत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये शिवगर्जना मेळाव्यात भाजप, शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. हिंमत असेल तर अदानींना नोटीस पाठवा, अशा शब्दात राऊतांनी हक्कभंगावरुन हल्लाबोल केला. कोल्हापूर छत्रपती शाहूंची भूमी आहे, कडवट इमानदारांची भूमी आहे. कोल्हापुरातील संदेश राज्यात जातो. पुन्हा एकदा शिवसेनेचं नंदनवन होईल, पानगळ झाल्याशिवाय वसंत बहरत नाही. मोदी यांना आव्हान देणारा देशात एकच नेता आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे, असेही राऊत यांनी या वेळी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.