आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाउंट हॅक:गृहराज्यमंत्री सतेज पाटल यांचे ट्वीटर अकाऊंट हॅक, सायबर सेलकडे तक्रार

कोल्हापूर7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • अकाउंटवरुन अद्याप चुकीचे मेसेज प्रसारित झाले नाही

गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे ट्वीटर अकाऊंट हॅक झाले आहे. अकाउंट हॅक झाल्याची तक्रार त्यांनी मुंबई सायबर सेलकडे केली आहे. आज (दि. १६) सकाळी अचानक त्यांचे ट्वीटर अकाउंट लॉक झाले असून सर्व ट्वीट्स डिलीट झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळी सतेज पाटील यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर अचानक ट्वीट्स दिसत नव्हते. शिवाय सतेज पाटील यांचे नावही नाहीसे झाले होते. ट्विटर प्रोफाईलवरून त्यांचा फोटोही नाहीसा झाला होता. त्यामुळे पाटील यांचे ट्वीटर अकाऊंट कोणीतरी हॅक केल्याचा संशय निर्माण झाला होता. परंतु, ट्वीटर अकाऊंट हॅक झाले असते तर आता पर्यंत ट्वीटर अकाऊंटवरून चुकीचा मेसेज हॅकरकडून झळकला असता, पण तसा कोणताही प्रकार घडलेला नसल्याची माहिती मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...