आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातारा:राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावरील हनी ट्रॅप फसला, गुन्हा दाखल

सातारा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांना बदनाम करण्याच्या हेतूने साताऱ्यातील एका तरुणीला हाताशी धरून कट रचणाऱ्या पुणे जिल्ह्यातील दोन, तर सातारा जिल्ह्यातील एकाविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित आरोपींचा सातारा तालुका पोलिस कसून शोध घेत आहेत.

पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आ. दिलीप मोहिते पाटील यांच्यावर एका तरुणीच्या माध्यमातून हनी ट्रॅप लावून त्यांची बदनामी करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्याचा डाव संबंधितांनी आखला होता. यासाठी संशयितांनी संबंधित तरुणीला एक लाख रुपये दिले होते. परंतु त्या तरुणीच्या मनाला ही गोष्ट न रुचल्याने तिने याबाबतची माहिती आ. मोहिते पाटील यांचे पुतणे मयूर साहेबराव मोहिते पाटील यांना दिली. यानंतर मयूर यांनी तत्काळ याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी शैलेश शिवाजी मोहिते पाटील (रा. सांगवी, जि. पुणे), राहुल किसन कांडगे (रा. चाकण, जि. पुणे) आणि सोमनाथ दिलीप शेडगे (रा. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

असा रचला सर्वांनी कट
शैलेश मोहिते व राहुल कांडगे हे दोघे १२ एप्रिल रोजी संबंधित तरुणीला भेटण्यासाठी साताऱ्यात आले होते. त्यांनी आम्हाला दिलीप मोहिते पाटील यांची बदनामी करायची असून त्यासाठी तुझी मदत आम्हाला लागणार आहे. तू त्यांच्या पुतण्याच्या माध्यमातून आमदारांकडे नोकरी माग व त्यांच्याशी घसट वाढवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ. एकदा का आमदार जाळ्यात आले की आपण पोलिसांत तक्रार दाखल करून त्यांना बदनामीची भीती घालू. त्यानंतर आ. मोहिते पाटील भरपूर पैसे देतील. त्या बदल्यात तुला पैसे, पुण्यात फ्लॅट घेऊन देतो. आम्ही तिघांनी परफेक्ट प्लॅन केला असून त्यात तू फक्त सहभागी हो, असे प्रलोभन तरुणीला देण्यात आल्याचे पोलिस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...