आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्यात सरपंचपदाच्या उमेदवारांचा अनोखा थाट:अर्ज भरायला निघालेल्या उमेदवारांची घोड्यावरून मिरवणूक

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या सातार्‍यातील कराड तालुक्यातील हिंनगोळे गावातील एका पॅनेलच्या उमेदवारांची चक्क घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक लागली की, गावातील वातावरण ढवळून निघते. त्यातच सध्या सरपंचपदाची निवड थेट जनतेतून असल्यामुळे मीच संरपंच होणार म्हणून अनेकांनी शडू ठोकलेत. त्या पद्धतीने फिल्डिंग लावण्यात सुरुवात केली आहे. अशी सर्वत्र परिस्थीती असतानाच हिंनगोळे गावातील सह्याद्री पॅनेलच्या सरपंच व सदस्य पदांच्या पुरुष उमेदवारांची फेटे बांधून घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली आहे.

त्यातच थेट जनतेतून सरपंच निवड असल्यामुळे सरपंचपदाच्या उमेदवाराचा थाट काही निराळाच असतो. सरपंचपदासाठी आणि सदस्यपदासाठी अर्ज भरणार्‍या उमेदवारांची घोड्यावरून काढण्यात आलेली मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. भगवे फेटे परिधान केलेल्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत ग्रामदैवताचे दर्शन घेतले. त्यानंतर सगळे अर्ज दाखल करण्यासाठी कराडला रवाना झाले. या मिरवणुकीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...