आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या 'मलाही मुख्यमंत्री व्हावे वाटते... ' या इच्छेवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या, पण एवढ्यावरच न थांबता उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावं, कोणी करणार का? असे सांगत पाटलांची फिरकी घेतली. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून एका पत्रकार परिषदेत त्यांना जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. पवारांच्या उत्ततरातून मुख्यमंत्री पदाबाबत त्याांनी सूूूचक इशारा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
सुप्रिया सुळे म्हणतात....
जर अजित पवारांचा जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे, यासाठी पाठिंबा असेल तर आमचा पाठिंबा नसण्याचे कारण नाही. आपल्या पक्षाचा, आपल्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा असण्यात गैर काय? अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. असे वक्तव्य करून त्यांनी एका अर्थी जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याला पाठींबाच दिला असल्याची चर्चा होत आहे.
काय म्हणाले होते जयंत पाटील....
इस्लामपूरमध्ये एका स्थानिक केबल वाहिनीच्या उद्घाटन प्रसंगी दिलेल्या मुलाखतीत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाविषयीची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री होण्याचे सर्व गुण आहेत, पण तरीही मुख्यमंत्री पद हुलकावणी देत आहे, असे वाटत नाही का किंवा मुख्यमंत्री व्हावेसे वाटत नाही का? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर जयंत पाटील यांनी ही इच्छा बोलून दाखवली. आमच्या पक्षाकडे मुख्यमंत्री पद आलेले नाही. तसेच प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावेसे वाटते. तसे मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, पण आमच्या पक्षात पक्ष आणि शरद पवार जो निर्णय घेतली तो अंतिम असतो, असे स्पष्ट करत आपल्या मनातील सुप्त भावना त्यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकार असंवेदनशील...
कृषी कायद्याबाबत बोलताना त्यांनी, केंद्र सरकार असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार केवळ बैठकांचा दिखावा करत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. शेतकऱ्यांबाबत पोलिसांच्या भूमिकेचा त्यांनी निषेध केला. भाजपच्या या असंवेदनशीलपणामुळेच भाजपाचे अनेक नेते पक्ष सोडत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.