आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • I Can Meet Prime Minister Narendra Modi Anytime If I Decide, But I Don't Want To Bring Credit In The Fight For Maratha Reservation MP Sambhaji Raje

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:मी ठरवले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधीही भेटू शकतो, पण मला मराठा आरक्षणाच्या लढ्यात श्रेयवाद आणायचा नाही - खासदार संभाजीराजे

कोल्हापूर7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रातील सर्व खासदारांना सोबत घेऊन भेट घ्यावी, संभाजीराजेंनी होती मागणी

मला एकट्याला जाऊन भेटणे आणि श्रेय घेणे शक्य झाले असते. मी ठरवले तर पंतप्रधानांना कधीही भेटू शकतो. पण मला मराठा आरक्षणाच्या लढ्यात श्रेय वाद आणायचा नाही. हा लढा सर्वांचा आहे. तो सर्वांना सोबत घेऊन लढायचा आहे. असे पत्र खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहे.

पत्रामध्ये म्हटले आहे की, तुमच्या माझ्या विषयीच्या भावनेचा मी आदर करतो. आपण सर्व जण मिळून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत राहू. मराठा आरक्षण मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची महासभा आज तहकूब करण्यात आली. त्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर महापालिका महापौर व पदाधिकाऱ्यांना पत्र लिहून भावना कळवल्या.

मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि संभाजीराजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारल्याच्या कारणावरून कोल्हापुर महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आली. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याच्या कारणावरून सभा तहकूब करणे हे मी मान्य करतो, परंतु मला मोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे म्हणजे केवळ राजकारण आहे. यामुळे मी तुम्हा सर्वांवर नाराज आहे. गेली 14 वर्षे मी मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात सक्रिय आहे. आजपर्यंत एकदाही या विषयात मी राजकारण आणले नाही. मराठा आरक्षण हे माझ्यासाठी राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे.

दीड वर्षांपासून कोल्हापुरातील हजारो कोटी रुपयांचा गॅस पाईपलाईन चा प्रकल्प महापालिकेच्या परवानग्या वाचून रखडलेला आहे. त्या परवानग्या तुम्ही दिल्या असत्या, तर कोल्हापूरच्या विकासात फार मोठी भर पडली असती. हा प्रकल्प मंजूर करून आणण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे. या योजनेमुळे सर्व कोल्हापूरकरांचे भविष्य बदलून जाणार आहे. कोल्हापूर च्या सर्वांगीण विकासात ही योजना मैलाचा दगड ठरेल. आजच्या तहकूब झालेल्या सभेत या प्रकल्पाला परवानग्या देणं आवश्यक होते. तसेच, कोल्हापूरच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम च्या टर्फ करीता 5.50 कोटी रुपये केंद्राकडून मी मंजूर करून आणलेत. तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान(टर्फ) बनणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मला समजते. त्या संदर्भातील परवानगी या महासभेत दिली असती तर मला आनंद झाला असता. कोल्हापुरातून आंतरराष्ट्रीय स्तराचे हॉकी खेळाडू तयार झाले पाहिजेत हे माझं स्वप्न आहे. कोरोनाचा कोल्हापुरात सर्वाधिक प्रकोप वाढला आहे. त्यासाठी अधिक नियोजन करण्याची गरज आहे, त्यासंदर्भातील उपाय योजना या महासभेत केल्या असत्या तर त्या अधिक योग्य झाले असते. पण तुम्ही सर्वांनी ही महासभा माझ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या भेटीच्या संदर्भाला चुकीच्या पद्धतीने घेतले.

राहिला मोदीजींच्या भेटी चा प्रश्न. आज पर्यंत मी जेव्हा केव्हा मोदीजींना वैयक्तिक भेटण्यासाठी गेलो तेव्हा आमची भेट झालीच आहे. पण यावेळी माझी पंतप्रधानांना अशी मागणी होती की, महाराष्ट्रातील सर्व खासदारांना सोबत घेऊन भेट घ्यावी. पण कोविडमुळे एवढ्या सर्वांना एकत्र येणे धोक्याचे ठरण्याची शक्यता असावी. त्यामुळे कदाचित त्यांना तशी वेळ देणे सध्या शक्य होत नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...