आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:मला आरोपांना उत्तर द्यायचे नाही; मी नियमाला धरून वागणारा माणूस, सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांचे स्पष्टीकरण

सातारा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्यावरील आरोप आणि आरोप करणाऱ्यांबद्दल मला उत्तर द्यायचे नाही. काहीही बोलायचे नाही. मी नियमाला धरून वागणारा माणूस आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे, अशा स्पष्ट शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्यातील कारभाराबद्दल अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. ६५ कोटीत खरेदी केलेल्या कारखान्याने ७०० कोटींचे कर्ज घेतले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच आपण ६ ऑक्टोबर रोजी बारामती आणि कोरेगाव येथे जाणार असून अजित पवार यांच्या जरंडेश्वर कारखान्याच्या मूळ सभासद शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचे सोमय्यांनी रविवारी सोशल मीडियावर जाहीर केले आहे.

उपमुख्यमंत्री पवार रविवारी खटाव येथील प्राथमिक आराेग्य केंद्राच्या भूमिपूजनासाठी आले असता प्रसारमाध्यमांनी सोमय्यांच्या आरोपांबद्दल त्यांना छेडले तेव्हा अजित पवार म्हणाले, ते दररोज आरोप करणार त्याला उत्तर देत बसणार नाही कारण मी विकासकामांना अधिक प्राधान्य देतो. सहकारी साखर कारखानदारी व सहकारी संस्था या मधल्या काळात नको त्या व्यक्तींकडे गेल्या आहेत, त्या चांगल्या विचारांच्या लोकांकडे द्या. तसेच सहकारात राजकारण शिरले आणि सहकार मोडीत निघाला असे सांगून व्यापारी दृष्टिकोनाला हरताळ फासल्यामुळेच सहकार चळवळ मोडीत निघायला सुरुवात झाली, असे ते म्हणाले.

जिल्हा बँक निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय
सातारा जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनेल करायचे अथवा नाही याबाबत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना मुभा देण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील हे यासंदर्भात चर्चा करीत आहेत व ते निर्णय घेतील असे स्पष्टपणे अजित पवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...