आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रेयसीची माफी मागण्यासाठी पुण्यात शिवडे आय एम सॉरी' आशयाचे तब्बल ३०० फलक लावलेला प्रेमवीर आजून लक्षात आहे. यातच आता कोल्हापूर जिल्ह्यात एक प्रेमवीर जन्माला आला, याने प्रेयसीची आठवण येतेय म्हणून तब्बल अडीच किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर 'आय मिस यु' आणि 'आय लव्ह यु' लिहलं आहे. मात्र हा प्रेमवीर कोण आहे आणि त्याने कोणासाठी हे लिहलं आहे हे मात्र गुपीतच आहे.
दरम्यान, या प्रेमवीराच्या कारनाम्यानंतर तालुक्यातल्या धरणगुत्ती ग्रामपंचायत प्रशासनाला मात्र चांगलंच काम लागलं असून त्यांनी अडीच किलोमीटरवर लिहिलेले सर्व संदेश ऑइल पेंटने पुसून टाकावे लागले आहेत.
रस्त्यावर 'आय लव यु' आणि 'आय मिस यु' असे ऑईल पेंटने लिहलं आहे. रात्रीच्या वेळी हे लिहिण्यात आले असावे. याचे फोटो आता जिल्ह्यात व्हायरल होत असून या प्रेमवीराची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. मात्र हा प्रेमवीर नेमका कोण आहे आणि त्याने कोणासाठी लिहलं हे मात्र अद्याप समजू शकलं नाहीये. मात्र हा जो कोण प्रियकर आहे त्याने हा रस्ता कधी रंगवला याचा कुणाला थांगपत्ता लागलेला नाही. जयसिंगपूर ते धरणगुत्ती हा ६ ते ७ किलोमीटरचा रस्ता आहे. गावाच्या तीन किलोमीटर अलिकडे 'आय लव यु' आणि 'आय मिस यु' लिखाणाची सुरूवात झाली आहे. तर गाव संपण्याच्या अर्धा किलोमीटर आधी हे लिखाण थांबलं आहे. दरम्यान, प्रेमात बुडालेला प्रियकर कोण आहे याची उत्सुकता पंचक्रोशीसह तालुक्यातील नागरिकांना लागली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.