आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चाची सांगता:मी एकटा मुंबईला जाणार नाही, चर्चेसाठी कोण आणि कधी जाणार, हे मराठा समन्वयक ठरवतील- संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यंना कधी भेटायच, हे उद्या ठरवू

मराठा मूक मोर्चाची सांगता झाली आहे. मोर्चानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सरकारबरोबर उद्या चर्चा करणार नाही. चर्चा कधी करायची, त्याचा निर्णय उद्या घेऊ. सरकार सकारात्मक पाऊले टाकत आहे. आम्हीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देणार आहोत, असे संभाजीराजे यावेळी म्हणाले.

मी एकटा चर्चेसाठी जाणार नाही
ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. पण मी एकटा चर्चेला जाणार नाही. मराठा समन्यवक ठरवतील चर्चेसाठी कोण जाणार आहे, त्यानंतर चर्चेसाठी जाण्याबद्दल निर्णय घेऊ. आम्ही सरकारला अनेक पर्याय दिले होते. पण, त्याबद्दल फारसे कुणी बोलले नाही. आमचा सर्वांचा अभ्यास झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आणि इतर मंत्री आपल्या भेटीसाठी तयार आहे. त्यांनी आपल्यासाठी चर्चेसाठी दारे उघडली आहेत, ही आपल्यासाठी चांगली बाब आहे, असेही संभाजीराजे म्हणाले.

अजित पवारांचा फोन आला होता
ते पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधी सुद्धा मला 4 जून रोजी फोन केला होता. मला त्यांनी मुंबईसाठी बोलावले होते. पण मी त्यांना सांगितले, आम्ही आमच्या आमच्या मागण्या मांडल्या आहे. मी एकटा तुम्हाला कशाला भेटू. उद्या कुणीही म्हणले, सगळं काही मॅनेज झालं तर काय करायचं. त्यामुळे मी ठरवलं आहे, भेटायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री असले पाहिजे आणि सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्यवक पाहिजे, त्यावेळी चर्चा होऊ शकते, असेही ते म्हणाले.

विषय ताणून धरण्याचा आमचा विचार नाही
ते पुढे म्हणाले की, त्यांनी 9 दिवस झाले काही निर्णय घेतला नाही, त्यामुळे आज आंदोलन करावे लागले. आम्ही त्यांच्या चर्चेचे स्वागत करतो. मराठा समाजासाठी आमच्या मागण्या मान्य करत असतील, लावून धरत असतील तर ते चांगलंच आहे. विषय ताणून धरणाच्या आमचा विचार नाही. पण, मी एकटा भेटायला जाणार नाही. मराठा समन्यवकांनी ठरवावं, कोण-कोण चर्चेला येणार आहे, तुम्ही ठरवावं, आपण मार्ग काढूया.

समाजाला वेठीस धरायचे नाही
ते पुढ म्हणाले की, लाँग मार्च काढण्याचा हा आपला शेवटचा पर्याय आहे. मी पहिल्याच दिवशी स्पष्ट केले आहे की, समाजाला वेठीस धरायचे नाही. आरक्षण हा वेगळा लढा आहे, तो सुरूच राहणार आहे. त्यात घटनादुरुस्ती असेल किंवा काही बदल असतील तर ते त्यांनी करावे. पण, आमच्या इतर ज्या मागण्या आहे, त्या जर मान्य करत नसतील तर कोणताही मार्ग काढत नसतील तर लाँग मार्च शिवाय पर्याय नाही. जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने मार्ग काढला तर आम्ही स्वागत करू, असेही ते म्हणाले.