आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दुर्दैवी:कोल्हापुरातील धक्कादायक घटना, वडिलांनी कानशिलात मारल्याने 6 वर्षीय मुलीचा मृत्यू

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर शहरातील कसबा बावड्यात एक अमानुष प्रकार आज पुढे आला. स्वतःच्याच मुलीला वडिलांनी जोरात कानशिलात लगावल्यावर तिचे डोके भिंतीवर आपटल्याने जखमी झालेली मुलगी मृत झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. अन्यना तानाजी मंगे (वय 6 रा. लाड बोळ, जयभवानी गल्ली, कसबा बावडा) असे दुर्दैवी मुलीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. पोलिसांनी मुलीचे वडिल तानाजी दिलीप मंगे (वय २९, रा. गुलबर्गा, राज्य कनार्टक) याला अटक केली.

कसबा बावडा येथील जयभवानी गल्लीत राहण्यास आलेल्या अन्यया मंगे या सहा वर्षीय मुलीचा शुक्रवारी मृत्यू झाला. मुलगी घरात खेळताना चक्कर येऊन पडून जखमी झाली आणि उपचारापूर्वीची मृत्यूमुखी पडली असे प्राथमिक कारण पोलिसांकडून सांगण्यात आले होते. पोलिसांना मृत मुलीच्या आई वडिलांकडून माहिती मिळाली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आल्यावर पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला. शहर पोलिस उप अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक सुमिता पाटील, पोलिस कॉन्स्टेबल तानाजी चौगले आणि राजू वरक यांनी तपासाची दिशा वळवली. पोलिसांनी कसबा बावडा जयभवानी गल्लीत चौकशी केली. पोलिसांनी अन्यनाचे वडील तानाजी यांना ताब्यात घेतले. त्यांनी मुलगी खेळताना पडली अशी माहिती दिली. पण पोलिसांनी खोलवर चौकशी केल्यावर त्यांनी मुलीला जोरात कानशिलात मारल्यावर तिचे डोके भिंतीवर आदळले. त्यामध्ये ती जखमी झाल्याची कबुली दिली. तानाजी मंगे यांना अटक केली आहे.