आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात बावधन येथील प्रसिद्ध बगाड यात्रेला काेरोनाचे नियम मोडत यंदाही प्रचंड गर्दी झाली. जिल्हा प्रशासन व पोलिसांनी बंदी घालूनही बावधन ग्रामस्थांनी रंगपंचमीच्या दिवशी पहाटे बगाड काढलेच. पोलिसांनी सुमारे १०० लोकांना ताब्यात घेतले.
मास्क तर दूरच, फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेले निर्बंध पायदळी तुडवत बगाड यात्रेत मास्क न वापरता सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा.
- भैरवनाथाची बगाड यात्रा रंगपंचमीच्या दिवशी होते. होळी पौर्णिमेच्या रात्री मंदिरात बगाड्या कौल लावून ठरवला जातो.
- या यात्रेत दगडी चाके असलेल्या लाकडामध्ये बांधलेल्या बगाड रथाला किमान बारा ते सोळा बैल जोडून हा गाडा ओढला जातो. बगाड यात्रेसाठी दरवर्षी मोठी गर्दी होते.
पैठणने दिला आदर्श : धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान, धन्य तेथील जन रहिवासी...
प्रतिष्ठान पावन नगरीत गेल्या साडेचारशे वर्षांपासून अखंडपणे साजरी होणारी नाथषष्ठी यंदाही साजरी झाली. परंतु, भक्तीने भारावलेल्या वैष्णवांची मांदियाळी या वेळी नव्हती. गर्दी टाळून या भक्तांनी यंदा काेरोनाविरुद्धच्या लढाईत आदर्शच घालून दिला.
संयमी वारकरी...
- दरवर्षी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यात यंदा प्रशासनाच्या नियमानुसार मोजकेच वारकरी होते.
- नाथवाड्यातून मानाच्या दिंड्या निघाल्या, परंतु दिंडीत २० वारकरी आणि ५० पोलिसांचा ताफा होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.