आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस दुवाँ मे याद रखना:कोल्हापूरात मुस्लिम तरुणांकडून होताहेत सर्वधर्मिय कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • ज्या त्या धर्मातील परंपरा संभाळून 70 हून अधिक अंत्यसंस्कार

कोरोना आजाराने माणूसकीच्या सगळ्या सीमा ओलांडून टाकल्या आहेत. म्हणूनच मृत्यूनंतर सग्या सोयऱ्यांची संगत सोडून अनाथाप्रमाणे अखेरचा प्रवास करण्याची वेळ माणसावर आली आहे. या पोरकेपणातही आपले समजून मृतदेहावर धार्मिक परंपरा सांभाळून अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीतील मुस्लिम तरुणांनी उचलली आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून आज अखेर विविध जाती धर्मातील जवळपास ७० हून अधिक मृतदेहांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. याशिवाय बेवारसांवर अंत्यसंस्कारांचे कामही सुरुच आहे. मृत्यूनंतर कोण काय घेऊन जाणार... फक्त जाणार्या व्यक्तीची दुवाँ मिळाली तरी बस....याच विचाराने जीवावर उदार होऊन हे तरुण कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करीत सामाजिक कार्य करीत आहेत.

राजर्षी छत्रपती शाहूंच्या संस्काराचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरात जाती धर्माच्या भिंती कधिच गळूण पडल्या आहेत. यापूर्वीही अनेक उदाहरणातून कोल्हापूरने हे दाखवून दिले आहे. सध्या कोरोनाच्या संकट काळात कोरोना बाधित मृहतदेहावर अत्यंसंस्कारासाठी नातेवाईकांंना परवानगी नाही. शासकीय यंत्रणा आहे, पण अनेकदा यंत्रणा तोकडी पडते. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. या काळात सुरुवातीपासून बैतुलमाल कमिटीने अंत्यसंस्काराची जबाबदारी उचलली आहे. कमिटी गोर गरीबांना अन्नधान्य पुरवण्यापासून सगळ्या प्रकारची मदत करीत असते. बेवारस मृतदेहांवर अंत्यंसंस्काराचे कामही वर्षभर सुरुच असते. पण कोरोना काळात अंत्यसंस्कार करण्यास कोणी पुढे येत नाही हे समजल्यानंतर अशा मृतदेहावर अंतसंस्कार करण्याचे कमिटीचे अध्यक्ष जाफरबाबा सय्यद यांनी ठरविले. त्यानुसार कमिटीतील दहा जण अंत्यसंस्काराच्या कामासाठी पुढे आले. त्यांच्या सुरक्षेसाठी पीपीईकीट व अन्य सामग्री उपलब्ध करुन देण्यात आली. आजअखेर हिंदू, मुस्लिम, जैन अशा सगळ्या धर्मातील कोरोना बाधित मृतदेहावर बैतुलमाल कमिटीच्या तरुणांनी अंत्यसंस्कार केले आहेत. त्यांच्यासोबत स्मशानभूमीत कार्यरत असलेले महानगरपालिकेचे कर्मचारीही अंत्यसंस्काराला मदत करतात. सध्या कोल्हापूरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अनेकदा या लोकांना एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन आल्यानंतर अंघोळ करायलाही वेळ मुश्किलीने मिळतो आहे. कीे तोपर्यंत आणखी एखाद्या अंत्यसंस्काराला जावे लागते आहे.

राजू गेले वीस वर्षे करतात कब्र खोदाईचे काम

कोल्हापूरच्या बागल चौक कब्रस्तानात गेले वीसवर्षाहून अधिक काळ राजू कुरणे हे कब्र खोदाईचे काम करतात. आयुबभाई आणि राजू दोघेजण याठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात. अंत्यसंस्काराला मृतदेह नेताना अनेकदा मृताच्या नातेवाईकांपैकी लोक येवून साहित्य देवून जातात.संस्कारासाठीची माहिती देतात. पण या कोरोनाच्या भयाने नातेवाईकांनी पूर्णपणे बेदखल केल्याचेही प्रकार आमच्या समोर आले. संबंधित फोनवरुन सांगीतात कि दवाखान्यातून तुमचेतुम्ही न्या आणि अंत्यसंस्कार करा. आमच्यापर्यंत त्यांचे काही आणू नका.असाही अनुभव आल्याचे अर्शद अत्तार यांनी सांगीतले.

कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांना विमा कवच

ग्रामीण भागात कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तींसाठी राज्य सरकारने ५० लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. येथील बैतुलमाल कमिटीच्या लोकांनाही विमा सुरक्षा कवच देण्यासाठी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ प्रयत्नशील आहेत.

बातम्या आणखी आहेत...