आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर बालविवाह:कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 14 वर्षीय मुलीचा 32 वर्षांच्या तरुणासोबत लावला विवाह, जिल्हाधिकारी रेखावारानी पुढकार घेत केली कारवाई

कोल्‍हापुर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापुरात १४ वर्षीय मुलीचा ३२ वर्षीय तरुणाशी विवाह लावून दिल्याचे निष्पन्न झाल्याने दोन्ही कुटुंबीयांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूरातील इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीचा विवाह सांगोल्याच्या सोमनाथ संजय भडंगे याच्याशी होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सुरुवातीला पुरावे गोळा केले.

मुलीच्या पालकांकडे चौकशी केली असता त्यांनी केवळ साखरपुडा झाल्याचे सांगितले. मात्र, प्रत्याक्षात मुलीचा विवाह लावण्यात आला होता. याप्रकरणी हसूरकर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर राहुल रेखावार यांनी स्वतः पुढाकार घेऊन हे प्रकरण उघडकीस आणले. याप्रकरणी मुलीचे आई, वडील मोनिका सागर हत्तेकर, सागर भैरू हत्तेकर, मुलांचे आई-वडील प्रियंका भडांगे, संजय भडंगे व सोमनाथ संजय भडांगे यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...