आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंचपदी बिनविरोध:कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा राज्यातील पहिला उमेदवार सरपंचपदी बिनविरोध

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर जिल्ह्यात ४७४ ग्रामपंचायतींसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची सोमवारी छाननी सुरू आहे. मात्र, निवडणुकीआधीच जिल्ह्यात पहिला निकाल जाहीर झाला आहे. राजापूरवाडी सरपंचपदी भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्याने गावात एकच जल्लोष झाला. शिरोळ तालुक्यात सतरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर राजापुरवाडी सरपंच पदासाठी भाजपचे उमेदवार रावसाहेब रामू कोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. अर्ज माघारीनंतर अधिकृत घोषणा होणार आहे. सोमवारी छाननीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

बातम्या आणखी आहेत...