आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाळेच्या नावावर हॉटेलमधून चहा आणल्याने वसतिगृहातील अधीक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना समजल्यावर पालक विद्यार्थ्यांना घरी घेऊन गेले. विद्यार्थ्यांवर गावातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित रेक्टरवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुमनताई पाटील यांनी व्यवस्थापनाकडे केली आहे. सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावचे जितेंद्र दरीनाथ बजबळे आणि बालाजी दरीनाथ बजबळे हे जुळे भाऊ तासगाव शहरातील एका मोठ्या विद्या मंदिरात सहावीच्या वर्गात शिकायला आहेत. दोघे भाऊ विद्या मंदिरच्या वसतिगृहात राहतात. विद्यार्थ्यांनी बाहेर जाऊन चहा आणला. त्यानंतर सर्वांनी वसतिगृहामध्ये चहा घेतला. हे निदर्शनास येताच शिपायाने विद्यार्थ्यांना मारहाण केली. नंतर वसतिगृहाच्या अधीक्षकाने प्लंबिंग पाइपने या दोन जुळ्या भावांसह चार विद्यार्थ्यांना मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.