आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा:साताऱ्यामध्ये अधिकाऱ्यांची खुर्ची कारमध्ये घालून नेली, रस्त्याचे काम होत नसल्याने माजी सदस्य संतप्त

सातारा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निधी मंजूर होऊनसुद्धा रस्त्याचे काम रखडल्याने वाई पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक ननावरे यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंता एस. व्ही. शिंदे आणि कनिष्ठ अभियंता कुणाल दीक्षित यांची खुर्चीच काढून कारमध्ये घालून नेली. त्यानंतर परिसरात एकच चर्चा रंगली होती.

बावधन शिवारातील कणूर (ता. वाई) गावातील महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे मागील दीड वर्षापूर्वी टेंडर मंजूर झले होते. अंदाजे २ लाख ३० हजार रुपयांचे काँक्रिटीकरणाचे काम होते. निधी मंजूर होऊन व वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ठेकेदाराला कामाचे आदेश न दिल्याने मंजूर रस्ता दीड वर्षानंतरही पूर्ण होत नसल्याने संतापलेल्या पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक ननावरे यांनी वाई पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची खुर्चीच काढून घेतली.

बातम्या आणखी आहेत...