आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकी थिजली:टेम्पो उलटून चालक ठार; लोकांनी संधी साधून टेम्पोतील कलिंगडे पळवली! माणुसकी थिजली, सातारा जिल्ह्यातील घटना

सातारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेम्पोतील कलिंगडे पळवताना शिंदेवाडी परिसरातील नागरिक. - Divya Marathi
टेम्पोतील कलिंगडे पळवताना शिंदेवाडी परिसरातील नागरिक.

सध्या कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने जगरहाटीला गती आली आहे. निर्बंध हटवल्याने सर्व व्यवहार सुरू झाले असल्याने महामार्गही गतिमान झाला आहे. याच महामार्गावर मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास कलिंगडे (टरबूज) घेऊन निघालेला टेम्पो उलटून अपघात घडला. या अपघातात चालक ठार झाला. सकाळी ही घटना शिंदेवाडीनजीकच्या नागरिकांना दिसल्यानंतर अपघाताबद्दल हळहळ व्यक्त होण्याऐवजी अपघातग्रस्त टेम्पोतील कलिंगडे पळवून नेण्यासाठी सुरू असलेली धावपळ पाहून माणुसकी थिजल्याचा प्रत्यय आला.

मंगळवारी रात्रीच्या वेळी नातेपुतेहून टेम्पोमधून कलिंगडाचा माल घेऊन चालक कोकणाकडे निघाला होता. शिंदेवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) गावच्या हद्दीत टेम्पो उलटला. रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळाल्यानंतर शिरवळ ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी टेम्पोचालक गाडीतच गंभीर जखमी अवस्थेत होता. त्याला बाहेर काढून शिरवळ आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तो मृत झाला होता.

नागरिकांनी पळवली अपघातग्रस्त टेम्पोतील कलिंगडे

रात्री अपघात झालेला कलिंगडांचा टेम्पो बुधवारी सकाळी शिंदेवाडी नागरिकांच्या निदर्शनास आला. अपघाताची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होण्याऐवजी नागरिकांनी टेम्पोतील कलिंगडे पोत्यात भरून पळवून नेण्याचा सपाटा लावला. एक वाहन अपघातग्रस्त झालेले असताना आणि त्यात त्याचा चालक ठार झालेला असताना नागरिक मात्र कलिंगडे पळवून नेत होते. हे चित्र पाहिल्यानंतर पोलिसांनाही कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली.

बातम्या आणखी आहेत...