आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:भांडणाचा वाद मिटवण्यासाठी झालेल्या बैठकीतच काठी, विटा, कोयत्याने वार

सांगली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिरजेत भांडणाचा वाद मिटवण्यासाठी झालेल्या बैठकीतच दोन गटात रॉड, टॉमी काठी, विटा व कोयत्याने वार करण्यात आले. यात चार जण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिली असून दोन्ही गटाांच्या १८ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी सचिन भोसले व वैभव मोरे या दोघांत कुपवाड औद्योगिक वसाहतीत वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही गटांची मिरजेत बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी वाद मिळण्याऐवजी पूर्वी झालेल्या भांडणाचा रागातून आदित्य मोरे याने सचिन यास शिवीगाळ केली. यावेळी पुन्हा वादावादी झाल्याने मोरे समर्थकांनी सचिन याच्यासह वृंदावन प्रणव या तिघांवर रॉड, टॉमीने हल्ला केल्याचे सांगण्यात आले.