आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रा:"चांगभलं’च्या गजरात मानाच्या सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली असून हजारो भाविक जोतिबावर दाखल झाले अहेत. मानाच्या सर्व सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. बुधवारी ५ एप्रिलला यात्रेचा मुख्य दिवस आहे. गेला महिनाभर सुरू असलेली तयारी पूर्ण झाली असून प्रशासन यात्रेसाठी सर्वतोपरी तयार झाले आहे. चांगभलंच्या गजरात मानाच्या सर्व सासनकाठ्या आणि भाविकांनी जोतिबा डोंगरावर हजेरी लावली आहे. डोंगर गुलालाने न्हाऊन निघाला आहे.चैत्र यात्रेसाठी केदारलिंग देवस्थान समितीकडून संपूर्ण नियंत्रण केले गेले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंदिर परिसर, पार्किंग व डोंगर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाहन पार्किंग ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने सुयोग्य वाहनतळ केल्याचे सांगण्यात आले आहे.

मुख्य दिवशी हे विधी होणार बुधवारी पहाटे पाच वाजता “श्रीं’ना तहसीलदार यांच्या हस्ते शासकीय अभिषेक होईल. दुपारी पालकमंत्री यांच्या हस्ते पूजनाने सासनकाठी सोहळा सुरू होईल. सायंकाळी पाच वाजता यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला “श्रीं’चा पालखी सोहळा होईल.