आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्यात बसखाली वृद्ध महिला चिरडली:मध्यवर्ती बसस्थानकातील घटना; बेघर वृद्ध महिलेच्या हृदद्रावक मृत्यूने हळहळ

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा मध्यवर्ती बसस्थानकात शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून बेघर वृद्ध फिरस्त महिला जागीच ठार झाली. हि घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली.

गौडाबाई काळे (वय- 75) असे संबंधित महिलेचे नाव आहे. सकाळी बसस्थानकात झालेल्या या अपघातामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा मध्यवर्ती बसस्थानकात शुक्रवारी (ता. 3) सकाळी सात वाजता मुंबईला जाणाऱ्या फलाटवरती शिवसाही बस क्रमांक (MH-06-BW- 0642) या गाडी सोबत हा अपघात झाला. यामध्ये शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून वृद्ध फिरस्त महिला जागीच ठार झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी पोहचले त्यानंतर त्यांनी पंचनामा केला. यावेळी संबंधित महिलेचा मृत्यू कोणाच्या चुकीमुळे झाला याचा तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान महिलेचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...