आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:डाॅक्टराकडून 10 लाखाची लाच घेणाऱ्या आयकर अधिकाऱ्याला अटक

कोल्हापूर7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
आरोपी प्रताप चव्हाण - Divya Marathi
आरोपी प्रताप चव्हाण
  • कोल्हापूरात भररस्त्यात सापळा रचून अँटिकरप्शनची कारवाई

डाॅक्टराविरुध्द आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी दहा लाखाची लाच घेणाऱ्या आयकर अधिकाऱ्याल कोल्हापूरात रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विल्सन पुलाजवळ अॅन्टीकरप्शन (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

तक्रारदार हे होमियोपॅथीक डॉक्टर असून त्यांनी डॉक्टरी पेशातून गैरमार्गाने प्रॉपर्टी मिळवल्याची तक्रार आयकर विभागाकडे होती. त्यानुसार आयकर निरीक्षक प्रताप महादेव चव्हाण (वय 35) चौकशी करत होते. तक्रारदार यांच्याशी दोन दिवसापूर्वी संपर्क साधुन चव्हाण यांनी संबंधित डाॅक्टरांना टाकाळा येथील कार्यालयात भेटण्यास बोलवून घेतले.

यावेळी अर्जदारांच्या विरुध्द प्राप्त झालेल्या तक्रारीबाबत चर्चा करुन व तक्रारदारांने गेल्या 6 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्नस भरले नसल्याने 50 लाख रूपये दंड होणार असल्याचे सांगितले. ती दंडात्मक कारवाई करावयाची नसल्यास 20 लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 14 लाख रुपये रक्कम देण्याचे ठरले.

याप्रकरणी तक्रारदाराने आयकर निरीक्षक प्रताप चव्हाण यांच्याविरुद्ध कोल्हापूर अॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून पंच साक्षीदारांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता पडताळणीमध्ये आयकर निरीक्षक प्रताप चव्हाण यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.

शुक्रवारी आयकर निरीक्षक प्रताप चव्हाण यांचेविरूध्द विल्सन पुल, शाहुपूरी, कोल्हापूर येथे सापळा रचून कारवाई केली. प्रताप चव्हाण यांनी मागणी केलेल्या लाच रक्कमेपैकी पहिला हप्ता म्हणून 10 लाख रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी चव्हाण यांच्याविरुद्द शाहूपूरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणेचे राजेश बनसोडे व अपर पोलिस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणेचे सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, शाम बुचडे, संजीव बंबरगेकर, अजय चव्हाण, मयुर देसाई, रुपेश माने, संग्राम पाटील, सुरज अपराध, अॅन्टी करप्णान ब्युरो, कोल्हापूर यांनी कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...