आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:कोरोना बाधितांच्या काॅन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा - पालकमंत्री सतेज पाटील यांच्या जिल्हा प्रशासनाला सक्त सूचना

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

ज्या भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे अशा भागांवर अधिक लक्ष केंद्रीत करा. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती (काॅन्टॅक्ट ट्रेसिंग) शोधण्यावर जास्तीत जास्त भर देऊन वेळीच उपाययोजना करा अशा सक्त सूचना गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिल्या.

पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले, खासगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची माहिती आणि डिस्चार्ज रुग्णांची माहिती सहायक आयुक्तांनी रोजच्या रोज घ्यावी. ही माहिती डॅशबोर्डवर अपलोड करुन नियंत्रण कक्षातून नियोजन करावे. खासगी रुग्णालयांनीही सकाळी आणि संध्याकाळी रुग्णांबाबतचा डाटा भरावा तालुकास्तरावरील, ग्रामस्तरावरील ग्राम समिती, प्रभाग समिती यांना पुन्हा एकदा सक्रिय करा. आशा स्वयंसेविका, आरोग्यसेवक यांची तपासणी यंत्रणांनाही सक्रिय करा. ज्या भागामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, मृत्यू वाढत आहेत अशा तालुक्यांवर, भागांवर अधिक लक्ष केंद्रीत करुन रुग्णांच्या जास्तीत जास्त संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधण्यात भर द्यावा. त्यांची वेळीच दक्षता घ्यावी.

२० केएल आॅक्सिजनसाठी सचिव कार्यालयाशी संपर्क

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज 20 केएल ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत पालकमंत्री पाटील यांनी थेट मुख्य सचिव कार्यालयात संपर्क साधून ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत मागणी केली. त्याचबरोबर मुरबाड येथील ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांशी जिल्हाधिकारी देसाई यांनीही संपर्क साधला. यासाठी आवश्यक असणाऱ्या टँकरच्या उपलब्धतेबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच पालकमंत्री पाटील यांनीही ट्रान्सपोर्ट असोसिएशनशी संपर्क साधला. मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे, अनावश्यक गर्दी न करणे, लक्षणे दिसताच आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधणे याची नागरिकांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. स्वत:सह इतरांचीही काळजी आणि दक्षता घ्यावी असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.