आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमचे बालपण वाचवा....:आम्हाला वाचवा..., अन्यथा आत्महत्या करावी लागेल; लाॅकडाऊन काळात बालकांची चाईल्ड लाईन हेल्पलाईनवर फोन करून मदतीसाठी आर्त हाक

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन काळात बालकांवरील अत्याचारांत वाढ, बाल हक्क संहिता असूनही देशाचे भविष्य धोक्यात

आम्हाला वाचवा...., वाचवा अन्यथा आत्महत्या करावी लागेल.... हे कुणा मोठ्यांचे बोल नसून लाॅकडाऊन काळात बालकांनी चाइल्डलाइन हेल्पलाइनवर फोन करून मदतीसाठी घातलेली आर्त हाक आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या तीन महिन्यांत चार लाखांपेक्षा अधिक असे काॅल आल्याची नोंद देशातील केंद्रीय बाल हक्क संरक्षण खात्याकडे झाली आहे. ही झाली लाॅकडाऊनची आकडेवारी, पण रोज त्यांचे बालपण कुस्करले जातेय त्याचे काय?

युनोच्या अधिसभेत मंजूर झालेल्या बालहक्क संहितेवर १० डिसेंबर १९९२ रोजी भारताने स्वाक्षरी केली आणि भारतीय बालकांना विशेष ५२ अधिकार देऊ करत त्यांचे अधिकार मान्य केले. सुरक्षित बालपण जगण्याचा अधिकारही याच संहितेने दिला आहे. पण आज ३० वर्षांनीही मुलांचे बालपण सुुुरक्षित नाही हेच समोर येत आहे. बालहक्क संहितेतील ५२ अधिकारांत सुरक्षित बालपण जगणे, सहवास, शिक्षण, स्वातंत्र्य हे प्रमुख चार अधिकार जरी असले तरी अनेक बालके या अधिकारांपासून वंचित असल्याचे दिसून येते. दिवसेंदिवस त्यांची सुरक्षितता धोक्यात येत आहे. तीस वर्षांचा नाही पण केवळ लाॅकडाऊन काळाचा विचार केला तर घरातच आणि तेही संबंधितांकडून मुलांवर अत्याचार झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या ठिकाणी दर दिवशी पाेक्साचे किमान दोन गुन्हे दाखल होत आहेत. भीतीपोटी दाखल न झालेल्यांची गणतीच नाही, असे राज्य बालहक्क संरक्षण समितीच्या सदस्या अॅड. दिलशाद मुजावर यांनी सांगितले.

लाॅकडाऊनमुळे बालमनावर गंभीर परिणाम झाले आहेत. यात बालकांचे मानसिक स्वास्थ्य ढासळणे, चिडचिडेपणा वाढला. हातात मोबाइल आल्याने नको त्या गोष्टी उघड झाल्या. बाल अत्याचारांत वाढ झाली असून हा अत्याचार ओळखीच्या लोकांनी केल्याचे उघड झाले आहे. पालकांच्या हातचे काम गेलेल्या अनेक कुटुंबांतील मुले मजुरीसाठी बाहेर पडल्याने बाल कामगार संख्येत वाढ झाली आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. परिणामी बाल भिकाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली तसेच बालविवाह, कुमारी माता, अपहरणाच्या घटना वाढल्या.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser