आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुरुज ढासळल्यामुळे दुर्गप्रेमींनी उठवला होता आवाज:पन्हाळ्याच्या ऐतिहासिक तटबंदीची अभियंत्यांकडून पाहणी

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी ऐतिहासिक पन्हाळगडावरील बुरुज ढासळल्यामुळे दुर्गप्रेमींनी आवाज उठवला होता. याबाबत बुधवारी आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशन, जिओलॉजिस्ट, नगरपरिषद, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम यांच्यावतीने पन्हाळा नाका ते पुसाटी बुरुज मार्गे, सज्जाकोठी पर्यंत ऐतिहासिक वास्तुंची आणि तटबंदीची पाहणी केली. पन्हाळ्यातील ऐतिहासिक वास्तू व तटबंदीची पडझड रोखण्यासाठीचा अहवाल येत्या गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणेंनी सांगितले.

संपूर्ण आराखडा बनवून असोसिएशन नगरपरिषदेकडे व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करुन पुरातत्व खात्याची परवानगी घेवुन पुढील कामकाज केले जाणार असल्याचे जिओलॉजिस्ट बाबा जगताप यांनी सांगितले. पन्हाळगड या ऐतिहासिक वास्तुंचे नेमके कोणत्या पद्धतीने संरक्षण करता येईल त्यासाठी नेमके काय करावे लागेल, याची जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठकीत चर्चा करणार असल्याचे कोराणेंनी सांगितले. या पाहणी समितीमध्ये संवर्धन तज्ञ चेतन रायकर, जिओलाजिस्ट बाबा जगताप, डॉ. नवघरे, जे. डी. पाटील, श्रीकांत शिंदे, पुरातत्वचे विजय चव्हाण, आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराणे, प्रशांत हाडकर, अंजली जाधव, सार्वजनिक बांधकामचे धनंजय भोसले, काटकर या अभियंत्यासमवेत माजी नगराध्यक्ष असीफ मोकाशी यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...