आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रम परिसरात संशयास्पद मृतदेह:गर्दीच्या धुडगुसात चेंगरून मृत्यू झाल्याची भीती, पोलिस तपास सुरू

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मिरज तालुक्यातल्या बेडग येथे इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रम परिसरात संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कार्यक्रमातल्या प्रचंड गर्दीने केलेल्या धुडगुसात चेंगरून एकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतेय.

मिरज ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणात तपास सुरू केला आहे. या कार्यक्रमात आता एकच चर्चा सुरू झालीय.

बेडगमध्ये गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम झाला.
बेडगमध्ये गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम झाला.

नेमके झाले काय?

मिरज तालुक्यातल्या बडगमध्ये रविवारी सत्कार कार्यक्रम झाला. यावेळी इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या लावणी नृत्याचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमस्थळ असलेल्या जिल्हा परिषद शाळा परिसरात आणि छतावर तुफान गर्दी उसळली होती. अनेक प्रेक्षक आवारातील झाड्यावर चढून बसले होते. या ओझ्याने झाडही उन्मळून पडले.

गौतमीची लावणी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती.
गौतमीची लावणी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती.

पोलिस तपास सुरू

लावणी कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत. या शाळेच्या परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढल्याने खळबळ उडाली आहे. दत्तात्रय विलास ओमासे असे मृताचे नाव असल्याचे समजते. ओमासे यांचा गर्दीत चेंगरून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद करत चौकशी सुरू केली आहे.

गौतमीच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याची भीती व्यक्त होतेय.
गौतमीच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याची भीती व्यक्त होतेय.

शिक्षकाचे ठुमके

गौतमी पाटीलचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेच्या आवारात झाला. यावेळी चक्क शिक्षकांनीही ठुमके लगावल्याचे व्हिडीओतून समोर आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजक, शिक्षक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कुमार कांबळे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...