आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कोल्हापूरचे नाव मोठे करेल..':आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधव देशातील नामांकित क्लब इस्ट बंगाल संघाशी करारबद्ध

कोल्हापूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू असलेल्या कोल्हापूरच्या अनिकेत जाधव देशातील नामांकित क्लब इस्ट बंगाल संघाशी दोन वर्षांकरीता 2 कोटी 35 लाख रूपयांच्या मोबदल्यावर करारबद्ध झाला आहे. इतके मोठे मानधन घेणारा तो पश्चिम महाराष्ट्रातील पहिला फुटबॉलपटू ठरला आहे.

भारतीय संघाचे प्रतिनीधीत्व

अनिकेतने 2017 साली सतरा वर्षाखालील युवा विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर त्याचा खेळ बहरत गेला. त्याला भारतीय फुटबॉल महासंघाने आपल्या ॲरोज या संघासाठी प्रति महिना 50 हजार रूपये मानधनावर करारबद्ध केले. त्याला त्याच्या स्ट्रायकरच्या खेळीने देशातील नामांकीत फुटबॉल संघ जमशेदपुर एफसी ने दोन वर्षांकरीता 90 लाख रूपयांकरीता करारबद्ध केले.

जगप्रसिद्ध ब्लॅक बर्न रोव्हर्स संघात निवड

या संघातील कामगिरीवर त्याची जर्मनीच्या जगप्रसिद्ध ब्लॅक बर्न रोव्हर्स या संघात खास प्रशिक्षणासाठी निवड झाली. या संघातील कामगिरीवर त्याची जर्मनीच्या जगप्रसिद्ध ब्लॅक बर्न रोव्हर्स या संघात खास प्रशिक्षणासाठी निवड झाली. येथे त्याला जगभरातील नामांकीत फुटबॉलपटूंसोबत सराव आणि सामने खेळता आले. याच प्रशिक्षणाच्या जोरावर त्याची यानंतर हैदराबाद एफसी फुटबॉल संघात स्ट्रायकर म्हणून निवड झाली. येथे तीन वर्षांकरीता सव्वा कोटी रुपये मानधनाचा करारबद्ध झाला.

आयएसएल लीगमध्ये दबदबा

आघाडीचा खेळाडू म्हणून त्याने आयएसएल लीग स्पर्धेत मोठा दबदबा निर्माण केला आहे. त्याच्या खेळीच्या जोरावर त्याला इस्ट बंगाल क्लबने दोन वर्षांकरीता 2 कोटी 35 लाख रूपये इतक्या मोठ्या मानधनावर करारबद्ध केले.

संघाच्या व्यवस्थापनाने अनिकेतचा हैदराबाद एफसी फुटबॉलसंघाशी करार अजूनही एक वर्षे शिल्लक असताना त्याला करारबद्ध केले आहे. त्याकरीता या इस्ट बंगालने हैदराबाद संघ व्यवस्थापनाला करार संपुष्टात आणण्यास 10 लाख रूपयांचा दंडही भरला आहे. ही करारबद्ध होण्याची प्रक्रीया गेली दोन दिवस सुरु आहे.

कोल्हापूरचे नाव मोठे करीन...

व्यावसायिक स्पर्धेतील माझी खेळी पाहून ईस्ट बंगाल संघाने मला माझा आदीच्या संघाशी करार असतानाही खेळण्याची ऑफर दिली. त्यासाठी लागणारी सर्व कायदेशीर प्रक्रीय लवकरच पुर्ण होईल. मी आणखी चांगला खेळ करून कोल्हापूरचे नाव आणखी मोठे करीन, असे अनिकेत जाधव याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...