आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल फोटोवरुन सवाल:अदानींसोबतच फोटो आहे ना? अंडरवर्ल्डच्या लोकांसोबत नाही ना?- अजित पवारांचे परखड मत

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे उद्योगपती गौतम अदानींसोबतचे छायाचित्र व्हायरल होत आहे. त्यासंदर्भात रविवारी पत्रकारांनी छेडले असता अदानींसोबतचाच फोटो आहे ना, अंडरवर्ल्डच्या लोकांसोबत तर फोटो नाही ना काढला, असा रोकडा सवाल करून अदानींच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याचा आदेश दिलेला आहे. समिती नेमल्यानंतर त्यांच्या संदर्भातील वस्तुस्थिती समोर येईल. त्यामुळे लगेचच कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यांत उभे करणे योग्य नाही,असे परखड मत मांडले.

अजित पवार रविवारी सातारा-मेढा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अदानी,आघाडीतील वाद आदी प्रश्नांवर खास अजित पवार स्टाईलमध्ये परखड उत्तरे दिली. संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) मागणीवरुन महाविकास आघाडीत फूट पडणार का यावर अजित पवार म्हणाले, जेपीसीवरून आघाडीत फूट पडण्याचा काय संबंध? असा सवाल करत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे तिघे जोपर्यंत महाविकास आघाडीच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत आघाडीला काहीही होणार नाही. काँग्रेस प्रवक्त्या अलका लांबा यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या टीकेसंदर्भातील प्रश्नावर अजित पवार संतापले. कोणी आम्हाला काही म्हटले, निशाणा साधला तरी आमच्या अंगाला भोके पडत नाहीत, रोज कोणीतरी ट्विट करत बसेल. आम्ही कोणाच्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधिल नाही. आम्हाला तेवढेच काम नाही. जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणे आमचे काम आहे.

राष्ट्रवादीत सर्व आलबेल, स्टँप पेपर लिहून देतो...

राष्ट्रवादीत सर्व आलबेल आहे का, या प्रश्नावर अजित पवार वैतागून म्हणाले, स्टँप देता का मला. स्टँपवर लिहून देतो. मी किती वेळा सांगितले की, मला कधी-कधी पित्ताचा त्रास होतो. एकदा खुलासा करूनदेखील तोच प्रश्न विचारलेला मला आवडत नाही. महत्त्वाचे प्रश्न सोडून तुम्ही कोण फडतूस म्हणतेय, कुणी काडतूस म्हणतेय हेच दाखवता.