आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:महापुराला एक ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌महिना झाला, दमडीही मदत नाही, स्वाभिमानी नेते राजू शेट्टींचा आक्रोश मोर्चात आरोप

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापूर येऊन एक महिना झाला. शेतकऱ्यांना अद्याप दमडीही मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांना मदत करण्यापेक्षा मोर्चा काढू नका, असा सल्ला देणारे आतापर्यंत झोपले होते का? अशा शब्दांत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील यांना फटकारले आहे. आक्रोश मोर्चासाठी ते दसरा चौक येथे आले असता ते प्रसार माध्यमांसोबत बोलत होते.मंत्री जयंत पाटील यांची बोगद्याची कल्पना म्हणजे भांडवली खर्च असणाऱ्या मोठ्या योजना जाहीर करायच्या आणि पैसे हाणायचे अशीच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. ते म्हणाले, मदतीचे धोरण अद्याप ठरलेले नाही असे मंत्री ओरडून सांगत आहेत. पण मदत पुनर्वसनचे सचिव असीम गुप्ता यांनी २०१५ च्या शासन निर्णयानुसार मदत मिळणार आहे. जास्तीत जास्त पाचशे कोटी लागतील. एक जबाबदार अधिकारी धोरण ठरल्याचे सांगत आहे. त्यामुळे मंत्री शुद्ध धूळफेक करत आहेत अशी टीका केली.

महापुरावर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे. भांडवली खर्च योजना प्रत्यक्षात येणार नाही. या केवळ कविकल्पना आहेत. भिंत बांधणार असला तर शिवाजी पूल, जयंती नाला बंद करणार काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...