आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टोलेबाजी:सहा तास काम करून राज्य चालवता येत नाही, चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला

कोल्हापूर7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, चंद्रकांत पाटील यांची मागणी

मी घरी बसून आढावा घेतोय ना....आता एवढे पुरेसे नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीतून बाहेर पडणे आवश्यक आहे. साडेपाच-सहा तास काम करून राज्य चालवता येत नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

राज्य चालवण्यासाठी वीस-वीस तास काम करावे लागते. एका मंत्र्यामुळे यंत्रणा हालते. तुम्ही तर मुख्यमंत्री आहात. तुम्ही बाहेर पडलात तर पटापट निर्णय होतील. प्रशासकीय यंत्रणा हलेल. राज्य चालवण्यासाठी ठाकरे यांनी व मंत्रालयात बसून कामकाज करावे, असेही पाटील म्हणाले.

राज्यात आणि मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, नागरी सुविधा देण्यास शिवसेना कमी पडते. दरवर्षी मुंबईत पाणी तुंबते. मात्र, यावर कधी शाश्वत विचार सेनेकडून होत नाही. शिवसेनेने लाँगटर्म विकास केला नाही. दरवर्षी तेच-तेच ठेकेदार नेमायचे. केवळ दिवस ढकलण्याचे काम शिवसेना करत आहे.

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

आम्ही सत्तेत असताना पनवेल-सायन मार्गावर खड्डे का पडतात याचा बारकाईने विचार करून त्यावर कायमचा तोडगा काढला. मात्र, शिवसेना असा का विचार करत नाही, असा सवाल पाटील यांनी केला. राज्यात पाऊस सुरू आहे. मराठवाडा व विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शक्य असेल तर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...