आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:गद्दारी करणाऱ्यांना लायकीपेक्षा अधिक दिले हीच आपली चूक झाली : आदित्य

सातारा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघात येऊन जोरदार हल्लाबोल केला. ‘ही गद्दारी केवळ शिवसेनेबरोबर झालेली नाही, ही गद्दारी केवळ उद्धव ठाकरेंबरोबर झालेली नाही, तर ही माणुसकीसोबत झालेली गद्दारी आहे. अशा गद्दारीला आपण पाठबळ देणार का, असा जळजळीत सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांनी केला. शिवसैनिकांनी ‘नाही... नाही’ म्हणत प्रतिसादही दिला.

आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला सातारा जिल्ह्यातही जोरदार प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातील विरोधकांना धडकी भरत आहे. आदित्य म्हणाले की, ‘ज्या शिवसेनेने त्यांना ओळख दिली, सत्ता आणि पदे दिली, त्याच शिवसेनेशी त्यांनी गद्दारी केली. शिवसेनेने त्यांना काय कमी केले होते? यांना लायकीपेक्षा अधिक दिले हीच आपली चूक झाली, असे म्हणावे लागेल. मागील चाळीस वर्षांत मुख्यमंत्र्यांनी जी खाती अन्य मंत्र्यांना दिली नव्हती, ती खातीदेखील त्यांना दिली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसताना, कठीण काळात साथ द्यायचे सोडून यांनी आपल्या कोण गळाला लागते, कोणाला फोडता येईल याचे ठोकताळे बांधत पक्ष फोडायला सुरुवात केली. हे आपल्याला योग्य वाटते का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना केला. तेव्हा, ‘गद्दारांचे करायचे काय... खाली मुंडी वर पाय’ अशा जोरदार यावेळी घोषणा घुमल्या.

यावेळी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल हर्षद कदम यांचा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उद्धवजी जनतेच्या मनात स्थान मिळवताहेत हे गद्दारांचे दुखणे उद्धवजींनी माणसासोबत निसर्गही सांभाळला. त्यांच्या काळात जातीय सलोखा उत्तम राहिला. कोठेही जातीय दंगली झाल्या नाहीत. सत्तेत आल्यावर पहिला निर्णय शिवरायांच्या रायगडासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा घेतला, तर शेवटचा निर्णय संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराचा घेतला. उद्धव ठाकरे हा माणूस मुख्य प्रवाहात येतोय, त्यांना जनतेच्या हृदयात स्थान मिळतेय, हेच या गद्दारांचे मूळ दुखणे असेल, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...