आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील एका जवानाला वीरमरण आले आहे. करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील संग्राम शिवाजी पाटील यांना शुक्रवारी वीरमरण आले. आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या जवानाला वीरमरण आल्याने कोल्हापुरावर शोककळा पसरली आहे.
यापूर्वी पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात ऋषिकेश जोंधळे शहीद झाले होते. दिवाळीच्या दिवशीच त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला आहे. शहिद जवान हे संग्राम पाटील हा सैन्यदलातील '16 मराठा बटालियन'मध्ये कार्यरत होते.
संग्राम पाटील हे अठरा वर्षांपूर्वी सैन्यदलामध्ये भरती झाले होते. त्यांची 17 वर्षाची मुदत गेल्या वर्षी संपली होती. सतरा वर्षे देश सेवा केल्यानंतर आणखी दोन वर्षे त्याने मुदत वाढवून घेतली होती. मात्र शुक्रवारी पाकिस्तानच्या भाड हल्ल्यामध्ये त्यांना वीरमरण आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.