आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यसभेच्या अतीतटीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या दिमाखदार विजयानंतर नूतन राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे कोल्हापूर येथे जल्लोषात स्वागत झाले. विजयी मिरवणूकीत गुलालाची उधळण झाली तसेच क्रेनच्या साह्याने मोठा पुष्पहार घालून दोन्ही नेत्यांचे स्वागत केले.
भाजमध्ये उत्साह संचारला
महाडीक यांच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण होते. शुक्रवारी मध्यरात्री रात्री निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सावाला सुरवात केली होती. आज विजय मिरवणुक ताराराणी चौकातून सुरुवात झाली यानंतर व्हीनस कॉर्नर - दसरा चौक - आईसाहेब महाराज पुतळा - बिंदू चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक - या मार्गे अंबाबाई देवीच्या आशीर्वादाने या रॅलीची सांगता झाली. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, हितचिंतकांनी या विजयी मिरवणुकीत सहभाग घेतला.
खूप काही सहन केल्यानंतर यश -महाडिक
''भारतीय जनता पक्षाला गेल्या दोन तीन वर्षांत अनेक ठिकाणी पिछेहाट सहन करावी लागली होती. पण देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून हे अशक्य कोट्यातील यश मिळवणे शक्य झाले आहे. राज्यसभेच्या या यशाने भाजप कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.