आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील पहिला आतंकवादी असणारा नथुराम गोडसे याला गुणरत्न सदावर्ते हा गोडसेजी म्हणतोय. गुणरत्न सदावर्तेच वक्तव्य ऐकले की घृणा येते किळस येतो. गोडसेजी असे म्हणणारा गुणरत्न सदावर्ते हा मूर्ख माणूस आहे, अशी टीका अल्पसंख्याक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच शरद पवार यांच्या घरावर हल्ला करवताना सदावर्तेमधील नथुराम गोडसे जागा झाला होता, असेही ते म्हणाले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ईदगाह मैदान परिसरातील सभागृह बांधकाम शुभारंभ प्रसंगी आव्हाड हे बोलत होते. महात्मा गांधी यांनी श्वास सोडताना कधीही हे राम म्हटल नव्हते हे गोडसेजी यांनी स्पष्ट केले होते , असे विधान गुणरत्न सदावर्ते यांनी केल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला आहे.
शरद पवारांच्या घरावर हल्ला करताना त्यांच्यामधला नथुरामच जागा झाला होता. 82 वर्षांचा वृद्ध माणूस, त्याची 78 वर्षांची पत्नी घरी आहे. त्या घरावर तुम्ही हल्ला करता. तुमच्या डोक्यात नथुरामच आहे. ते तुम्ही बोलून दाखवले. नथुरामजी गोडसेजी असा उल्लेख केला. आमच्या दृष्टीने भारतातला पहिला आतंकवादी नथुराम होता. ज्यानं महाराष्ट्रावर गांधीहत्येचा जो काळा डाग आहे. तो या नालायक माणसामुळे आहे. तो डाग आपण पुसू नाही शकत. जगात कुठेही असे विचारले जाते की हा नथुराम कुठला. तेव्हा नथुराम महाराष्ट्रातला असल्याने आपल्यला शरमेने मान खाली घालावी लागते, अशा शब्दात आव्हाड यांनी हल्लाबोल केला.
गांधींनी या देशाला फसवले असे एखादा वेडा माणूसच म्हणू शकतो. ज्या गांधींपुढे नेल्सन मंडेला, जगातले सगळे मोठे नेते नतमस्तक झाले, आजही होतात. या देशातले नेते विदेशात गेले की एकच नाव कानावर पडते, ते म्हणजे महात्मा गांधी. त्या गांधींबद्दल असे बोलताना त्यांना काहीच वाटले नसेल का?असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.