आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्साहात पार पडली. यासाठी जोतिबा डोंगरावर काल पासूनच तब्बल तीन लाख भाविक दाखल झाले होते. मात्र यावेळी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 20 वर्षीय भाविकाचा 50 फूट दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. यावेळी आणखी एकाने प्राण गमावला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
ज्योतिबाच्या नावाने चांगभलं या गजरात ज्योतिबाची यात्रा पार पडली. यासाठी तब्बल आठ लाख भाविक ज्योतिबा डोंगरावर उपस्थित राहिल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला. यामुळे यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जय्यत तयारी केली होती. मात्र 2 जणांना यावेळी आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली.
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मुख्य दिवशी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील भिकवडी येथून आलेल्या 20 वर्षीय प्रमोद धनाजी सावंत या भाविकाचा सकाळच्या सुमारास दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर मुंबई भांडुप येथून आलेले 59 वर्षीय भाविक संजय दत्तात्रय शिंदे यांचा देखील हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
असा कोसळला दरीत
मृत प्रमोद सावंत भाविक हा नातेवाईकांसोबत यात्रेसाठी डोंगरावर आला होता. दरम्यान हा तरुण काल पहाटे पावणेसहाच्या सुमारास दक्षिण बाजूच्या डोंगर उतारावर गेला आणि अंधारात अंदाज न आल्याने पाय घसरुन सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळला. त्याला दरीतून बाहेर काढून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.