आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भरदिवसा कोल्हापूरात बसली जात पंचायत:कंझारभाट समाजातील पंचायतीकडून प्रेमविवाह प्रकरणाचा निवाडा

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कोल्हापुराच्या न्याय संकुलापासून काही मिटर अंतरावर बसली जात पंचायत

जात पंचायती बरखास्त करून लोकशाही मार्गाने न्यायालयात न्यायनिवाडा व्हावा यासाठी कायदा झाला पण तरीही काही समाजात जातपंचायती भरतात आणि निवाडे होतात. आज असाच एका प्रेम विवाहातून घटस्फोटापर्यंत पोहचलेला खटल्यात निवाडा करण्यासाठी चक्क कोल्हापूर शहरात जात पंचायत बसली. कोल्हापुरातील न्यायसंकुलापासून काही मीटर अंतरावर बसलेल्या या पंचायतीत मुलीवर दबाव आणून घटस्फोट घेण्याचा सल्ला वजा धमकी देण्यात आली.

दुपारी साडेबाराची वेळ कोल्हापूरच्या न्यायसंकुलापासून काही मिटर अंतरावर एका झाडाखाली कंझारभाट समाजाची पंचायत बसली. याठिकाणी अंबरनाथ (पुणे) येथील मुलगी आणि कोल्हापूर येथील मुलाने केलेल्या प्रेमविवाहाचा घटस्फोट करुन देण्याचे काम सुरू होते. मुला मुलीने वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केला होता. मुलाच्या घरी मुलगी राहू लागली. पण तिचा वारंवार छळ सुरू झाल्याने मुलगी माहेरी निघून गेली. सध्या मुलाच्या घरच्यांकडून मुलीकडे सोडचिठ्ठी देण्याची मागणी केली जात होती. आज तर या प्रकरणी चक्क जात पंचायत बसवण्यात आली. मुलीची इच्छा नसतानाही तिच्यावर दबाव आणून तिला घटस्फोट देण्याचा आग्रह जात पंचायत करीत होती.

आम्ही पंच आहोत कोणी ऐरेगैरे नाही

याठिकाणी मुलीला ठरल्याप्रमाणे साडेतीन लाख रुपये व्यवहार पूर्ण करून घटस्फोट दे, असे सांगितले जात होते. पंचायत म्हणत होती, आम्ही पंच आहोत कोणी ऐरेगैरे नथ्थुखैरे नाही. आम्ही सांगतोय त्यानुसार घटस्फोट दे. पण मुलीने जे काय बोलायचे असेल ते मी कोर्टात बोलीन असे सांगितले.

याप्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी कंझारभाट समाजातील या नागरीकांवर कारवाई केली. यावेळीही दबावाखाली असलेल्या पिडीतेने हे सगळे लोक माझे नातेवाईक असल्याचे सांगून घटस्फोट घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणत आहेत असे सांगितले.

समाजातील पंचायतीत होणारे निवाडे बेकायदेशीर असूनही कंझारभाट समाजात आजही पंचायत बसते. याविरोधात अनेकदा मी आवाज उठवला आहे पण मला आणि माझ्या कुटुंबाला समाजाने बहिष्कृत केले. आजही छुप्या पद्धतीने पंचायत बसते. याबाबत शासनाने कठोर पाऊल उचलून एकतर्फी निवाडे करणार्या जात पंचायतींवर कारवाई केली पाहिजे असे कंझारभाट समाजातील सामाजिक कार्यकर्ते, मुंबई मुख्य विद्युत निरीक्षक कार्यालयातील उपसंचालक कृष्णा इंद्रेकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...